पालघर. ( प्रतिनिधी ) - नुकतेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तलासरी पंचायत समितीच्या प्रमुख पदांची निवडणूक पुन्हा एकदा जिंकली. कॉ. नंदकुमार हाडळ यांची सभापती पदी आणि कॉ. राजेश खरपडे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तलासरी पंचायत समितीतील सर्व १० सदस्य हे आदिवासी आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १९६२ पासून सलग ५८ वर्षे तलासरी पंचायत समिती जिंकत आला आहे हे विशेष आहे. ७ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीत माकपने भाजपचा आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून तलासरी तालुक्यातील पंचायत समितीच्या १० पैकी ८ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ४ जागा जिंकल्या. पालघर जिल्ह्यात माकपने पंचायत समित्यांच्या १२ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ६ जागा अशा एकूण १८ जागा समितीवर| वॉचमॅनचा कापला जिंकल्या. २०१५च्या निवडणुकीपेक्षा पक्षाच्या ३ जागा वाढल्या. ऑक्टोबर २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत, माकपचे तरुण उमेदवार कॉ. विनोद निकोले यांनी भाजपचे विद्यमान आमदार यांचा पराभव करून डहाणू (अज) ही जागा जिंकली. डहाणूच्या विधानसभा क्षेत्रात संपूर्ण तलासरी तालुका आणि बराचसा डहाणू तालुका याचा समावेश आहे. डहाणू (पूर्वी जव्हार) ही विधानसभा जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १९७८ नंतर झालेल्या १० पैकी ९ निवडणुकीत जिंकली आहे, फक्त २०१४ चा एकमेव अपवाद वगळता.