कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली यादी आज

गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी १ मार्चला कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा


मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाईल; एप्रिल अखेरपर्यंत ही कर्जमुक्ती पूर्ण होणार असल्याचे सांगतानाच गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी १ मार्च रोजी काढण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा करून शेतकरी व कामगारवर्गाला एकाच वेळी दिलासा दिला. ___ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला आणि शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू असल्याचा दाखलाच दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन लाखांचे कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली । पान ६ विरोधकांचे वय ६ वर्षे असते तर त्यांनाही चष्मा दिला असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नसून केवळ स्थगिती देण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं काम सुरू केलं आहे. हे विरोधकांनी डोळे उघडे ठेवून बघावं, त्यांचं वय ६ ते १८ वर्षे असतं तर त्यांनाही चष्मे दिले असते', असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला.