भिवंडी : तालुक्यातील गोदाम पट्ट्यातील विकसित असलेल्या माणकोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हर्षदा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंचपदासाठी हर्षदा माळी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी इंद्रजीत काळे यांनी हर्षदा माळी यांची सरपंच म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी कल्पना भोईर, करिश्मा माळी, सुनील माळी, श्रीकृष्ण माळी, सुनील केणी, सारिका केणी आदी उपस्थित होते.
माणकोलीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या हर्षदा माळी
• Dilip Singh