पत्नीची हत्या करून भिंतीवर कबुली

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने काढला काटा


माझ्या पत्नीचे या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असून हा त्याचा मोबाईल क्रमांक आहे. म्हणूनच मी माझ्या पत्नीची हत्या करत आहे, असा मजकूर भिंतीवर लिहून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मीरा रोड भागात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार खुनी पतीचा शोध घेत आहेत. ___ मीरा रोड परिसरातील गीतानगर फेज एकमधील दर्शन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नासिर खान आणि शमीम खान आणि त्यांची ३ वर्षांची मुलगी गेल्या महिन्यातच भाड्याने राहण्यास आले होते. नासिरने पत्नी शमीम हिची गळा दाबून हत्या केलीहत्या केल्यावर घरातील भिंतीवर त्याने माझ्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्यामुळे तिची हत्या केली, असे लिहिले. तसेच ज्याच्यावरून नासिर शमीमवर संशय घेत होता त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांकसुद्धा भिंतीवर लिहिला. शमीमने नासिरवर यापूर्वी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.